कर्मचाऱ्यांनी बार्टी संस्थेचा नावलौकिक उंचावण्यासाठी काम करावे – धम्मज्योती गजभिये… बार्टी संस्थेत राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन..

251

पुणे- स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील परिषदेमध्ये भारतीय संस्कृती व अध्यात्मिक यांची मांडणी करून जगात भारताची मान उंच केली आज भारत जगाचा अध्यात्मिक क्षेत्रात विश्व गुरू आहे यांचे सर्व श्रेय स्वामी विवेकानंद यांचे आहे. तसेच राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याची प्रेरणा दिली.

बार्टी संस्थेतिल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे व वंचितांना न्याय द्यावा आणि बार्टी संस्थेचा नावलौकिक उंचावण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांनी बोलताना व्यक्त केले.

गुरूवार दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी बार्टी पुणे येथे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात मा. गजभिये हे बोलत होते.राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये, विभागप्रमुख, श्रीमती नंदिनी आवडे, विभागप्रमुख तथा निबंधक श्रीमती स्नेहल भोसले, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

श्रीमती स्नेहल भोसले विभागप्रमुख, डॉ. सारिका थोरात, प्रकल्प व्यवस्थापक, डॉ. अंकुश गायकवाड, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, श्री. नरेश गोटे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, श्रीमती गौरी सोनवणे, यांनी मनोगत व्यक्त करुन अभिवादन केले.यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले. आभार श्रीमती रंजनी वाघमारे, प्रकल्प अधिकारी यांनी मानले