स्वच्छ्ता अभियान व जनजागृती झाकिने दुमदुमली ब्रम्हपुरी नगरी… सिनेकलावंतांनी भारावले प्रेक्षक – कृषि प्रदर्शनाने वेधले लक्ष

698

सांस्कृतिक, क्रीडा, कृषी,शैक्षणीक याचा वारसा जपणाऱ्या ब्रम्हपुरी महोत्सवाची आज नगर स्वच्छता अभियानाने व जनजागृती पर शहरातून निघालेल्या विवीध वेशभूषा झाकीने संपुर्ण ब्रम्हपुरी नगरी दुमदुमली.तर सिनेकलावंतांची विशेष उपस्थिती आकर्षनिय ठरली.

आज ब्रम्हपुरी महोत्सवाचे थाटात उद्घाटन पार पडले. याप्रसंगी प्रामुख्याने अध्यक्ष म्हणुन ब्रम्हपुरी महोत्सवाचे आयोजक माजी कॅबिनेट मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणुन प्रसिध्द सिने अभिनेता सोनू सूद, विशेष अतिथी सिने अभिनेते, असरानी, प्राजक्ता माळी,प्रमूख अतिथी म्हणून आ. सुभाष धोटे, किरण विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार संपादक श्रीपाद अपराजित,माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी जिल्हा बँक अध्यक्ष संतोष रावत, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ॲड.राम मेश्राम, नगराध्यक्ष रिता उराडे , व ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, व इतर मान्यवर उपस्थित होते.
आज पासुन सुरू झालेल्या महोत्सवाच्या पूर्वार्धात नगर स्वच्छता अभियान तसेच नगरातील कलावंतांसाठी आयोजीत रांगोळी स्पर्धा, यातून कलावंतांनी रांगोळीतून साकारलेले थोर महात्म्यांचे चित्र विशेष आकर्षण ठरले. तर दुपारी संपूर्ण शहरातुन निघालेल्या जनजागृती पर झाकीने नगरवसियांचे लक्ष वेधले.

कृषी महोत्सवाने वेधले नागरिकांचे लक्ष
ब्रम्हपुरी महोत्सव 2023 च्या पहिल्या दिवशी तालुक्यासह दूर वरून आलेल्या नागरिकांना कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी विशेष असे विवीध स्टॉल लावून आधुनिक तंत्रज्ञाननानातून शेती, शेती पूरक व्यवसाय याबद्दल अधिकाधिक माहिती देऊन याचा नागरीकांना शेती व्यवसायातून प्रगती यांचे महत्त्व पटवून दिले.

सोनू सूद , प्राजक्ता माळी, आदिती गोवित्रीकर यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी…
सिने अभिनेते सोनू सुद यांची चित्रपटसह कोरोना काळात दाखविलेली सह हृदायता यामुळे प्रचंड लोकप्रियता यामुळे ते चाहता वर्गाच्या गळ्यातील ताईत बनले. सोबतच ज्येष्ठ अभिनेते असराणी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी, सिने अभिनेत्री आदिती गोवित्रीकर, यांना बघण्यास प्रचंड गर्दी उसळली.