धाबा येथे खैरे कुणबी सामाजिक सभागृह मंजूर करा…अध्यक्ष नामदेव सांगडे व सहकारी सदस्यांचे आ. सुभाष धोटे यांना निवेदन…

264

धाबा: गोंडपिपरी तालुक्यात येत असलेल्या धाबा येथील कोंडय्या महाराजांच्या यात्रा महोत्सव घटस्थापना दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री. सुभाष धोटे यांचे हस्ते शुभारंभ पार पडला.दरम्यान धाबा येथील खैरे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेवजी सांगडे यांनी धाबा गावातील वार्ड नंबर १ मधील खैरी कुणबी समाज बांधवांची सामाजिक उपक्रमांच्या, उत्सवाच्या कार्यक्रमांची अडचण आ.सुभाष धोटे यांच्या लक्षात आणून दिली.

धाबा येथे वार्ड क्रमांक १ मध्ये खैरे कुणबी समाज बांधवांची खूप मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. येथील समाज बांधवांना सामाजिक उपक्रम घेण्याकरिता सार्वजनिक उत्सवाकरिता बसण्याची कायमस्वरूपी जागा नसल्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील ४५०० चौरस फूट जागा समाजाने आपल्या वहिवाटीत केली आहे. सदर जागेवर आपले निधीतून सामाजिक सभागृह झाल्यास समाज बांधवांचा बैठक व्यवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो. करिता साहेब आपण सदरची अडचण लक्षात घेता आम्हाला सामाजिक सभागृह बांधकामासाठी निधी मंजूर करावे असे निवेदन धाबा येथील खैरे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव सांगडे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.सुभाष धोटे यांना दिले.

सदर निवेदनाची दखल घेत आ. सुभाष धोटे यांनी सामाजिक सभागृहासाठी निधी मंजूर करून खैरे कुणबी समाज बांधवांची अडचण लवकरच दूर करणार असल्याचे आश्वासन दिले. निवेदन दरम्यान नामदेव सांगडे अध्यक्ष खैरे कुणबी समाज मंडळ तथा माजी सरपंच धाबा, बालाजी चनेकार, चंपत भस्की, शांताराम चनेकार, प्रदीप खारकर, आनंदराव भस्की, जानकिराम हिवरकर, सदाशिव भस्की, किशोर भस्की, लक्ष्मण फलके, हरीचंद्र हिवरकर, लटारू गोहने, गुनाकर भूरकुंडे, रावजी चनेकार, बाबुराव सांगडे यांनी निवेदन दिले.