आयुष्मान कार्ड असेल तर मिळेल राव,पाच लाखांपर्यंतचा मोफत ईलाज..

363

बळीराम काळे

जिवती : ( तालुका प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य राज्य सरकारने माहत्मा फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून,आयुष्मान भारत ही योजना राबवली जात आहे.या योजनेअंतर्गत रुग्णांना पाच लाखांपर्यंत आरोग्य विम्याच्या माध्यमातून एकूण १२०९ मोफत उपचार शस्त्रक्रिया दिली जाणार आहे.

तरी जिवती तालुक्यातील लाभार्थ्यांना कार्डचा लाभ मिळू शकणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या २९ हजार. ९२४ एवढी आहे.
तसेच २०११ साली झालेल्या आर्थिक,सामाजिक व जातीनिहाय जनगणनेच्या यादीत नाव असणारे व्यक्ती व या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्डची आवश्यकता आहे.
हे कार्ड सी. एस.सी.केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र किंवा योजनेअंतर्गत अंगीकृत रुगणालया मध्ये मोफत वीलाज वितरीत करण्यात आलेले आहेत.महाराष्ट्र शसनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना केशरी,पिवळे,आंतोदय आणि अन्नपूर्णा रेशन कार्डधारक कुटुंब पात्र लाभार्थी असून,एकूण ९९६ उपचार शस्त्रक्रियेकरीता प्रतीवर्ष,प्रती कुटुंब दीड लाखांचा आरोग्य विमा पुरविण्यात येत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड लाखांचा आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत साडे तीन लाख असे,एकूण पाच लाखांपर्यंतचे विलाज मोफत होणार आहेत.त्यामुळे उपचारापूर्वी लाभार्थ्यांनी आपले नाव आयुष्मान भारत या योजनेत समाविष्ट आहे का,याची खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे.पात्र लाभार्थी यादी ही आरोग्य विभागाला प्राप्त झालेली आहे. व ही यादी तालुक्यातील ग्राम पंचायत व शहरी विभागात वार्ड कार्यालय येथे उपलब्ध आहे.आयुष्मान यादीत नाव नसेल तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

*या दवाखान्यात मोफत आरोग्य उपचार घेता येतील*
गाडेगोने रुग्णालय, डॉ.अजय वासाडे रुग्णालय, मुसळे रुग्णालय, मांनवटकर रुग्णालय,ही पाच खाजगी रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर,ग्रामीण रुग्णालय, बलारपूर व मुल,चिमूर आणि वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय,असे पाच शासकीय रुग्णालय,अशी चंद्रपूर जिल्ह्यतील एकूण १० रुग्णालये,या योजनेअंतर्गत अंगीकृत असून येथे उपचार / विलाज घेता येणार आहे.

आयुष्मान भारत योजनेत तालुक्यातील २९ हजार ९२४ लाभार्थ्यांचा समावेश आहे.त्यापैकी पाच हजार ६८३ लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढले असून १९% टक्के काम पूर्ण झाले आहे.आणखी जे आयुष्मान कार्ड काढायचे राहिले असतील त्यांनी काढून घ्यावे.
ग्राम पातळीवर आशा वर्कर,ग्राम पंचायत कर्मचारी,ग्रामसेवक संगणक परिचालक (केंद्र चालक)यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणत जनजागृती सुरू आहे.

– डॉ. स्वप्नील टेंभे
तालुका वैधकिय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र,जिवती