उर्जानगर जि. प.शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा…

269

शुभम जुमडे तालुका प्रतिनिधी

चंद्रपुर:- येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उर्जानगर ( कोंडी ) येथे दि.08 मार्च 23 रोज बुधवार ला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माता पालक संघ, गावकरी महिला व विद्यार्थी -विद्यार्थीनी यांच्या रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, गीत गायन, एकल नृत्य व समूह नृत्य असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पारखी हे होते, तर सदर कार्यक्रमाला सरपंच मंजूषा येरगुडे, मुख्याधापक सुधाकर धानोरकर,शाळा उपाध्यक्ष छोटीबाई रायपुरे, सदस्य नामन पवार,ग्राम पंचायत सदस्या आवळे, कावळे, ठाकरे, इरपाते, देठे शाळा सदस्या, माता पालक सदस्या, आंगनवाड़ी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते. तसेच शिक्षक नांदे सर,दर्वे सर,वांढरे मॅडम, कांमडे मॅडम, गादेवर मॅडम,कातकर मॅडम आदिनी प्रयत्न केले.