गडचिरोली येथे १२७ आदिवासी समाजातील युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा

356

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक)

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी व मैत्री परिवार संस्था नागपूर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे 26 मार्च रोजी आदिवासी समाजातील युवक-युवतींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आम. डॉ देवराव होळी, आम कृष्णा गजबे,पोलिस विभागाचे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ संदीप पाटील, आयुक्त राजकमल, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंढके, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुज तारे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिलडा व मैत्री संस्थेचे पदाधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या सामूहिक विवाह सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील 127 आदिवासी समाजातील युवक युवतींचा व 8 आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दाम्पत्याचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी खासदार अशोक नेते, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी सामूहिक विवाह प्रसंगी उपस्थिती दर्शवून नव दाम्पत्याना शुभ आशीर्वाद व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.