“त्या मुजोर” वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यामुळे राम भक्तांविरुद्ध पोलिस तक्रारीने आलापल्लीत नवा वाद

519

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक)

आल्लापल्ली:- अयोध्येतील राम मंदिरासाठी लागणारे सागवान गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वन विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातून पाठवण्यात येत आहे. तर दुसरीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सागवान चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगून सर्व देशाची दिशाभूल करीत असल्याने वादाला नवीन तोंड फुटले असतांना आलापल्ली येथून अयोध्येतील राममंदिरासाठी सागवान पाठविण्यात आले असल्याने देशभरात गौरवाने नक्षलग्रस्त गावाचे नाव उंचावले आहे.

आलापल्ली येथे रामभक्तांनी २६ मार्चला शासकीय क्रकचालय (Saw Mill) या ठिकाणी उपस्थित वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल यांनीही विधिवत सागवनाचे काष्टपूजन केले. त्यानंतर आलापल्ली शहरातून शोभायात्रा काढून झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी “त्या मुजोर” वन विकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने अहेरी पोलिस ठाण्यात रामभक्तांविरुद्ध विनापरवाना काष्टपूजन करून शोभायात्रा काढल्याचा आरोप करत तक्रार अर्ज दिला आहे.

तर दुसरीकडे सदर मुजोर अधिकारी स्वतः सागवनाची काष्टपूजन केले असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी असलेल्या रामभक्तांनी केला आहे. त्यामुळे ते गुन्हेगार नाही फक्त रामभक्तच दोषी कसे या आरोपाच्या फैर्यांमुळे शहरात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली असू “त्या मुजोर” अधिकाऱ्या विरोधात रोष व्यक्त केल्या जात असून वनविकास महामंडळाच्या आगार डेपोत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आणि पुन्हा त्याच क्रकचालय (SAW MIII) चा अतिरिक्त पदभार देऊन या ठिकाणीही भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता जनमानसात केली जात असून या मुजोर अधिकाऱ्याची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता असल्याचा आरोप नागरिकांत होत असून वेळ आल्यास रामभक्त त्या अधिकाऱ्या विरोधात आंदोलनही करणार असल्याचे बोलले जात आहे.

पत्रपरिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केली टीका.


अयोध्येतील राम मंदिरासाठी लागणारे सागवान गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविकास महामंडळामार्फत पाठवण्यात येत आहे. मात्र, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सागवान चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगून सर्व देशभरातील नागरिकांची दिशाभूल करून श्रेय चंद्रपूरला देत असल्याची टीका पत्रपरिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आरोप केले आहे.