कोरोडो कोंडलेल्या श्वासांचे मुक्तिदाता म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर; आकाश कडूकर यांचे प्रतिपादन

166

राजुरा: गुलामाला स्वयंस्फूर्तपणे गुलामीची जाणीव होतनसते. त्याला गुलामीची जाणीव करून द्यावी लागते. म्हणून डॉ. बाबासाहेब म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो त्याविरूध्द पेटून ऊठेल. शिका! संघटित व्हा! संघर्ष करा हा मूलमंत्र जोपासणे गरजेचे आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोरोडो कोंडलेल्या श्वासांचे मुकिदाता आहे.असे प्रतिपादन आकाश कडूकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.

राजुरा तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी (ता.१५) सायंकाळच्या सुमारास करण्यात आले. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीताने करण्यात आली.प्रास्ताविक विकास कोतपल्लीवर यांनी केले. त्यानंतर चित्रकला,रांगोळी,निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना बक्षीस वितरण करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण प्रा.इर्शाद शेख यांनी केले.
क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांनी शूद्र आणि आतिशूद्रांच्या मुक्तिसाठी, तसेच महिला स्त्री मुक्तीसाठी प्रयत्नशील होते. आजच्या महिलांनी तसेच प्रत्येक त्यांचे विचार त्यांनी दिलेला लढा, संघर्ष आत्मसात केला पाहिजे.असे प्रयल म्हशाखेत्री यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील सरपंच गणपत पंधरे, उपसरपंच विजया करमनकर, पोलीस पाटील बंडू भोंगळे,सदस्य सोनू कमलवार, रवी सोयाम, सुनील चौथले, विद्या टेकाम, मंगला गौरकार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश ठावरी, गणेश करमनकर, लैजाबाई रामटेके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शेंडे यांनी तर आभार प्रवीण चौधरी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील जीवतोडे,प्रज्वल बोरकर,मयूर जानवे, समीक्षा मोडक,सागर बोरकर,श्रुती बोरकर,समीक्षा जीवतोडे,विशाल शेंडे,प्रवीण चौधरी,तेजस वडस्कर, साहिल मडावी,कारण उरकुडे आदी विद्यार्थी उपस्थित होते.