डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य एका जाती धर्मापुरतं मर्यादीत नाही.सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले.आम्हाला ओबीसी म्हणून ओळख सुद्धा संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबानी दिली आहे. असे प्रतिपादन प्रा.अनिल डहाके यांनी केले.
शिव शाहू फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, पायली भटाळी तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रा.अनिल डहाके,प्रमुख व्याख्याते डॉ.समीर कदम यांनी शिवराय ते भीमराव या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच राकेश गौरकर यांनी केले. प्रबोधन सत्रानंतर युवा गायक साहिल भारती आणि त्यांचा संच यांच्या प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शुद्धोधन मेश्राम सर यांना पुरस्कृत करण्यात आले.तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार निलेश डवरे यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित बावीस्कर, सागर कातकर, विकास पेंद्राम, नामदेव मडावी, सोनू आगासे, नदीम रायपूरे, विठ्ठल गोहने, भुषण आमने, प्रवीण उपरे, शाहरुख कातकर, रोहित बावीस्कर, गणेश तुरांनकर, प्रमोद खिरटकर, गोलू धोपटे, अमित उपरे, ईश्वर मुसळे, अजय साव, सचिन उपरे, शरद देवतळे, अमित साव, बंडूभाऊ सोनटक्के व समस्त गावकरी व युवा वर्ग यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन अनिकेत दुर्गे यांनी तर ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या सहकार्य करणाऱ्यांचे आभार सागर कातकर यांनी मानले.