विहीरीतुन पाणी काढतांना तोल गेल्याने वृद्धाचा बुडून मृत्यु

359

चिमूर: विहिरीतून बकऱ्यांसाठी पाणी काढत असतांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने काग येथील वृध्द शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना (ता.१७)
सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. पांडूरंग झिंगुजी नैताम ( ६५ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे.
मृतक हा सकाळी बकऱ्या घेऊन गेला.त्याच्या शेताजवळ असलेल्या रविंद्र कानुजी मेश्राम याचे शेतात असलेल्या विहिरीवर बकऱ्यांना पाणी पाजण्या करीता गेला.पाणी काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडला.रविंद्र मेश्राम हा शेतात काम करत होता. विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने तो विहिरीजवळ आला.बकऱ्या विहिरीच्या बाजुला दिसल्या, मात्र त्याला मृतक पांडूरंग दिसला नाही. विहिरीत डोकावुन पाहीले असता बादली, दोर तरंगताना दिसल्याने पांडूरंग विहिरीत पडल्याची शंका आली.
या घटनेची माहिती त्याने रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी स्वारांना दिली.आणि घटना गावात येऊन सांगीतली.सदर घटनेची माहीती चिमूर पोलिसांना मिळताच पोलीस हवलदार प्रविण तिराणीक, शंकर बोरसरे हे घटना स्थळावर पोहचले. गावकऱ्यांच्या मदतीने प्रेत विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पोलीसांनी घटनेचा पंचणामा केला.मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. ठानेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरु आहे.