बल्लारपूर. कौटुंबिक कलहातून रागाच्या भरामध्ये एका उच्चशिक्षित तरुणीने पित्यासमान व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.ही घटना शनिवार (ता.२२ ) रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. मृतककाचे नाव विशाल काशिनाथ दासरवार (वय४६) असे आहे.ही तरुणी दादाभाई नौरोजी वार्ड येथील असून ती मृतकाची नातलग आहे. घटनेनंतर तरुणीने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन हत्त्या केल्याची कबुली दिली. मृतक विशाल काशिनाथ दासरवार हे दादाभाई नौरोजी वार्ड येथील रहिवाशी आहे. त्याला दारूचे खुप व्यसन होते. त्यामुळे कुटुंबात नेहमी वाद होत होते. हत्या करणारी तरुणा ही मृतक व्यक्तीच्या साळीची मुलगी असून दोघेही एकाच घरात राहत होते. ती उच्चशिक्षित असून तीचे एम.बी.ए पर्यंत शिक्षण झाले आहे. कुटुंबात नेहमीच वाद होत होते. या वादाला कंटाळून रागाच्या भरामध्ये हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर त्या तरुणीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. या हत्याकांडात कुटुंबीयांसह अन्य व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय येत असल्याने हात्याकांडाचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश हत्तीगोटे करीत आहे.