ऊर्जा विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात एकाच दिवशी दोन ठिकाणी एकाच विद्यार्थ्यांची परीक्षा : परीक्षा थांबवून चूक सुधारा खासदार बाळू धानोरकर यांची ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती…

590
  1. चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण निर्मिती कंपनी मर्यादित द्वारे असिस्टंट इंजिनिअर इलेक्ट्रिकल व ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल या पदासाठी अचानक ५ दिवसाअगोदर परीक्षा जाहीर केली. २७ एप्रिल ला सकाळी ७.३० व ११.३० वाजताचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. याउपरही अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऐच्छिक सुचविलेले परीक्षा केंद्र न देता ५०० ते ९०० किमी दूरवरची परीक्षा केंद्रे देण्यात आली. असिस्टंट इंजिनिअर व ज्युनिअर इंजिनिअर दोन्ही साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांना जाणूनबुजून वेगवेगळी केंद्रे देण्यात आली. त्यामुळे दोन्ही पदांसाठी परीक्षा देणाऱ्यांना अडचण निर्माण झाली. अनेक वर्षांपासून परीक्षेची वाट बघणाऱ्या उमेदवारांना खर्चिक व अडचणींच्या अटी शर्तींमुळे या परीक्षेपासून वंचित राहावे लागेल.

तसेच २६ एप्रिल ते २८ एप्रिल याच कालावधीत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, मध्य प्रदेश जनरेशन कंपनी या देखील परीक्षा व मुलाखती आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महानिर्मितीच्या परीक्षा त्वरित समोर ढकलून उमेदवारांवर अन्याय होऊ देऊ नये अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांची ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.