अतुल गण्यारपवार मारहाण प्रकरणी ठाणेदार राजेश खांडवे यांना निलंबित करा… आर्य वैश्य गोंडपिपरी महासभा आक्रमक…

1294

गोंडपिपरी:आर्य वैश्य कोमटी समाजाचे चामोर्शी येथील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व माजी जी प सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना आठवडाभरापूर्वी ठाणेदार राजेश खांडवे यांनी सकाळी ५ वाजता ठाण्यात बोलावून बेदम अमानुष मारहाण केली.मारहाणीत हाताला व डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने गंभीर जखमी असून गण्यारपवार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.या अमानुष मारहाणीमुळे महाराष्ट्रभर कोमटी समाजात संतापाची लाट असून समाज बांधव आक्रमक झाल्याचे दिसत आहे.सोमवारी दि.(२४) चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात गण्यारपवारांना झालेल्या मारहाणीचा निषेध करन्यात आला.गोंडपिपरी येथे तहसीलदार राजेश मडामे यांच्या मार्फत गृहमंत्र्यांना निवेदन देत ठाणेदार खांडवे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आठवडा भरात न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला.

यावेळी गोंडपिपरी तालुक्यातील आर्य वैश्य कोमटी समाजबांधव अमर बोडलावार, अजय माडुरवार, सुहास माडुरवार, रवींद्र वेगिणवार, किशोर माडुरवार,सुनील वेगिणवार,रितेश वेगिणवार,स्वप्नील माडुरवार,अतुल कासमगोटूवार,नाना बोडलावार,प्रवीण नरशेट्टीवार,निखिल माडुरवार,सतीश आईनचवार,दत्तात्रय गंधमवार,अमित वेगिणवार,बंटी बोनगीरवार,प्रमोद आईनचवार,डॉ शैलेश आईनचवार,मनोज नरशेट्टीवार,सचिन चिंतावार,आनंद बोनगीरवार,बालु चिंतावार,विजय बचुवार,अनील आईनचवार,सुधाकर कोडमलवार,रोहित आईनचवार, यांच्यासह शेकडो समाजबांधवांची व सामाजिक कार्यकर्ते महेंद्रसिंह चंदेल यांची उपस्थिती होती.