गोंडपिपरी तालुक्यात सहा शिवसेना शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर नवनियुक्त शाखा प्रमुखांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा 

415

गोंडपिपरी: सध्या स्थितीत राज्यात शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू असताना शिवसेना नेमकी कुणाची हे कोर्टाच्या निर्णयानंतर लवकरच समजणार आहे.अशावेळी गोंडपिपरी तालुक्यात मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात नवचैतन्य दिसून येत आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने पक्षात जोश संचारला आहे.दि.(२९) शनिवारी स्थानिक विश्राम गृहात शिवसेना पक्षाची बैठक पार पडली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत कदम,जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे,जिल्हा उपप्रमुख संदीप करपे यांच्या मार्गदर्शनात प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांच्या नेतृत्वात अमोल कुकुडकर तारसा(बुज) शाखा प्रमुख,धिरज मडावी सुरगाव शाखा प्रमुख,दर्शन वासेकर आक्सापुर

शाखा प्रमुख,अमोल कंन्नाके शिर्सी बेरडी शाखा प्रमुख,स्वप्नील नागापुरे पेल्लूर शाखा प्रमुख,पंकजसिंग डांगी जोगापूर शाखा प्रमुख पदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी जिल्हा उपप्रमुख संदीप करपे,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,अशपाक कुरेशी,युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते,युवासेना शहर प्रमुख विवेक राणा यांची उपस्थिती होती.