दुर्गम क्षेत्रात सेवा देणे,हे मोठे धाडस..मारोतराव रायपूरे केंद्रप्रमुख

267

चंद्रपूर: नवीन बदली धोरणानुसार दुर्गम/अवघड क्षेत्रात बदली झाली असतांना ती सहज स्वीकारून सेवा देणे हे मोठे धाडस असल्याचे मार्डा केंद्राचे केंद्रप्रमुख मारोतराव रायपूरे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेंडली पंचायत समिती चंद्रपूर येथे शुक्रवार दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप प्रसंगी शुभेच्छा दिल्यात.
हा कार्यक्रम विजय नळे सहायक शिक्षक यांचे सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक वृक्षा नळे यांचा सत्कार, प्रकाश चुनारकर मुख्याध्यापक , सीमा भसारकर विषय शिक्षक यांचे स्थानांतरण निमित्त तर इयत्ता ७ वी तील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रतिमा अलवलवार सरपंच वेंडली उद्घाटक नंदकिशोर टोंगे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हे होते.
प्रमुख अतिथी राजकुमार नागपूरे उपसरपंच,श्रीरंग वरारकर, संध्या पिंपळशेंडे,शितलताई खामनकर,अमित वानखेडे सदस्य ग्रामपंचायत वेंडली तर विशेष अतिथी सविता देवाळकर उपाध्यक्ष, सुनिता पिंपळकर, पल्लवी कोट्टे, माधुरी चालुरकर, लक्ष्मी आमटे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती वेंडली होते.
पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनीनी स्वागत गीताने केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश चुनारकर यांनी केले.प्रास्ताविकांतून त्यांनी सत्कार कार्यक्रमाची भूमिका विशद करून सत्कारमूर्तींचे शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे सातवीतील विद्यार्थ्यांना निरोप प्रसंगी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
सत्कार मूर्तींनी यावेळी आपले विविध अनुभव कथन करून सत्काराप्रती आभार प्रकट केले.
निरोप प्रसंगी सातवीतील मुलींनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्रीकांत पिंपळशेंडे माध्यमिक मुख्याध्यापक.हनुमान देवगडे,अतुल पोहाणे, शंकर आसनपल्लीवार प्राथमिक मुख्याध्यापक.अमोल देठे,सतिश दुवावार,शाम पाचघरे स.शि. यांनी यावेळी सत्कार मूर्ती विजय नळे ,सीमा भसारकर यांचे बद्दल प्रासंगिक अनुभव कथन,प्रकाश चुनारकर यांचे बद्दल संघटनात्मक तथा प्रासंगिक अनुभव कथन केले.
कार्यक्रमाला सुषमा देवाळकर, शंकर नागपूरे,प्रकाश अलवलवार, महादेव देवाळकर,किरण धोटे, शशिकला टोंगे, करिश्मा देवाळकर, मिलिंद नैताम, साधना मोरे, रविंद्र नागपूरे, मनिषा देवाळकर, बबिता कोट्टे,मयुरी भुसे आदी पालकांसह फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मनोज बेले सहायक शिक्षक तर चैताली देवाळकर शिक्षण प्रेमी यांनी उपस्थितांचे आभार मानले.