आंदोलनापूर्वीच शिवसेनेच्या मागणीला यश वर्षभरापासून बंद असलेली टोल नाक्यावरील दुतर्फा वाहतूक अखेर सुरू

901

गोंडपिपरी-गेल्या वर्षभरापासून नवेगाव (वा.) येथे टोलची निर्मिती करण्यात आली होती. टोल बंद अवस्थेत असून दुतर्फा वाहतूक बंद होती.येथिल आवागमनाचा एक मार्ग बंद ठेवण्यात आले होते.अश्यावेळी या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात अहेरी ते चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावरुन हजारो वाहणे रोज सुरजागडवरून लोहखनिज घेऊन वाहतूक करत असतात.परंतु एकाच बाजूने जाणे आणि येणे सुरू असल्याने अर्धा – अर्धा तास वाहतूक त्या ठिकाणी खोडंबून असायची.परिणामी गोंडपिपरी तालुक्यातील दुचाकीस्वारांना, ऑटो चालकांना,कारचालकांना,शेतकऱ्यांना सर्वच नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत होता.अर्धा अर्धा तास हायवा सलग जात असल्याने कधीकधी अर्धा – अर्धा तास त्या ठिकाणी वाहतूक बंद असायची.प्रवाशांना थांबावं लागायचं.त्याच्यामुळे जो बंद ठेवलेला जो मार्ग आहे तो मार्ग सुरू करून वाहतूक सुरू करावी या मागणीला घेऊन दि.(२२)सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) गोंडपिपरीतर्फे शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते.शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांच्या नेतृत्वात युवासेना ता प्रमुख तुकाराम सातपुते,युवासेना शहर प्रमुख विवेक राणा, युवासेना तालुका उपप्रमुख गौरव घुबडे व अनेक शिवसेना शाखा प्रमुखांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,पोलीस विभाग,सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन माहीती देण्यात आली होती.शिवसेनेच्या आंदोलनाच्या निवेदनाची दखल घेत आंदोलनापूर्वीच मागणी पूर्ण करण्यात आली शुक्रवारी त्या टोल च्या ठिकाणी दोन्ही बाजूने दुतर्फा वाहतूक सुरू आली.प्रवाशांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे.