खाजगी व इंग्रजी शाळेकडून होणारी लूट थांबवा…राहुल देवतळे यांचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन..

429

चंद्रपूर…शहरातील काही खाजगी व इंग्रजी शाळेकडून विविध प्रकारच्या ट्युशन फी, स्पोर्ट फी,युनिफॉर्म,स्टेशनरी आदी फी वसूल केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.याबाबत खाजगी व इंग्रजी शाळांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष श्री. राहुल देवतळे यांनी जिल्हाधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांचे कडे लेखी निवेदनातून केली आहे.शासकीय शाळा ह्या सरकार कडून बंद करण्यात आल्या असून व खाजगी शाळांना मान्यता मिळाल्यापासून शाळा व्यवस्थापन समितीने पालकांना न झपण्यालायक फी व शाळेने ठरविलेल्या दुकानातून पुस्तके व युनिफॉर्म घ्यावे लागते आहे.या करिता शाळा प्रमुखावर कुठेतरी आळा बसावा याकरिता शासनाने लक्ष द्यावे,खाजगी व इंग्रजी शाळांवर कुठल्याही खर्चाचा ताण नसतांना.शालेय शुल्कात भरमसाठ वाढ करणे व त्यासाठी वारंवार पालकांकडे पैश्याची मागणी करणे हे योग्य नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.यावर संबधित शाळांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष श्री.राहुल भाऊ देवतळे,यांच्यासह अक्षय सकदेव,नयन डोईफोडे,गजानन हिरेमठ,शुभम ठाकरे,आशिष खडसे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते….