विषारी सर्पदंशाने 14 वर्षीय मुलीचा मृत्यू… चिमूर तालुक्यातील घटना

570
  1. चिमूर: तालुक्यातील खडसंगी येथील बेघर वस्ती येथे बुधवारी रात्रो 9:30 च्या सुमारास वर्षीय अनुजा शंकर शेंडे (14) ही मुलगी घरी झोपण्याकरिता खाटेवर गेली असता उशीचा बाजूला असलेल्या विषारी सापाने चावा घेतला हे तिचा आई वडिलांचा लक्षात आल्याने त्यांनी तिला उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले आज 25 मे रोजी गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहीती चिमूर पोलिसांना देन्यात आली. रुग्णालयात पोलीस उप निरीक्षक भिष्मराज सोरते, पोलीस हवालदार भारत गोडवे यांचेसह पोहचून घटनेची नोंद घेतली. प्रेत उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले. चिमूर पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आले मुलीचा अचानक मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.