चिमूर :शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रिय महार्गावरील शहिद बालाजी रायपूरकर चौकानजीकच्या चार दुकांनातील मागील दार तोडून शुक्रवारच्या रात्रो चोरट्यांनी सोनुसेल येथुन २ लाख ५५ हजार रुपये रोख चोरली.तसेच असवा वस्त्र भंडार येथुन १ लाख ४० हजार रुपयाचे कपड्याचे गठ्ठे चोराणे चुरूण नेल्याची घटना आज २७ मे शनिवारला सकाळी १०.०० वाजता उघडकीस आली.
चिमूर शहरातील राष्ट्रिय महामार्गावर असलेल्या सोनु सेल, राजीक वेल्डिंग,असावा वस्त्रभंडार,बालाजी प्रिंटीग प्रेस व बाजुचे गोडाऊन मागील दार चोरांनी फोडल्याचे सकाळी दुकान उघडायला आल्यांनतर दुकानदारांच्या लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली.अकरम शेख यांच्या मालकीच्या सोनु सेल वरील टॉवरचे दार तोडून दुकाणाच्या गल्ल्यात ठेवलेले २ लाख ५५ हजारांचा रोखीवर डल्ला मारला.कमल असावा यांच्या मालकीच्या असावा वस्त्र भंडार वरील गोडाऊनचे तथा बालाजी प्रींटीग प्रेसच्या बाजुचे गोडाऊनचे दार तोडून जवळपास दिड लाख रुपये किंमतीचे कापडाचे गठ्ठे चोरट्यांनी पडवुन नेले. दुकानात शिरण्या करीता लोखंडी दार तथा मोठा कुलर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यानी केला.
राजीक वेल्डीग,बालाजी प्रिंटीग या दुकानांची मागील बाजुची दार फोडली मात्र त्यांना रोख किंवा किंमती सामान मिळाले नाही.चोरीची तक्रार चिमूर पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आली.घटनास्थळावर पोलिस निरीक्षक मनोज गभने,सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद जांभळे,पोलिस हवालदार विलास निमगडे,कैलास अलाम यांनी जाऊन पाहणी केली.सांयकाळच्या सुमारास स्वान पथक तथा ठसे तज्ञ आले पाहणी केली.चिमूर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चोरा विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास चिमूर पोलिस करीत आहेत.एकाच रात्रो चार दुकान फोडून दोन दुकानामधुन रोख व माल चोरी गेल्याने व्यापारी तथा नागरीकांत भिती निर्माण झाली आहे. चोरांना हुडकुन काढण्याचे आव्हान चिमूर पोलिसा समोर आहे.