मोठी बातमी: दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर निकाल कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या…

925

पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दहावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. बोर्डाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीय. तेव्हा या सर्वच विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक आणि शिक्षकांना निकालाबाबत उत्सुकता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकालmahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.

10वी चा निकाल कसा पाहाल?

अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in वर लॉग इन करा.

महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.

सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.

लॉगिन करा आणि तुमचा महा10वीचा निकाल तपासा SSC Result

यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2023 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली.

दहावी परीक्षेचा निकाल कसा पाहायचा?

दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागले. येथे विद्यार्थ्यांना तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.

निकाल बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर नीट बघून एंटर करणं आवश्यक आहे. आईचं नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे. त्यानंतर येणारं बेसिक बेरीज किंवा वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.