भंगाराम तळोधी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

584

गोंडपिपरी: पूण्श्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जयंतीचे औचित्य साधून भंगाराम तळोधीत धनगर समाजाचा वतीने अहिल्याबाई होळकर मंदिर निर्माण उद्घाटन  सोहळा मा जि.प.सदस्य मा.अमर भाऊ बोडलावार  यांचा हस्ते संपन्न झाला,तसेच नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा ईंद्रपाल धूडसे, संचालक मा संजनाताई अम्मावार यांचा सत्कार करण्यात आले.12 वीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन म्हणून सत्कार करण्यात आले.

यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी भंगाराम तळोधीचे सरपंच सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार, माजी पं स सभापती सूनिता येग्गेवार, धनगर समाज अध्यक्ष बिरा बाना कंकलवार व मल्लना येग्गेवार ,        माजी उपसरपंच मारोती अम्मावार, धनगर समाज व मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.