दबा धरुन असलेल्या वाघाच्या हल्ल्यात म्हस ठार;युवक जखमी चिमूर तालुक्यातील घटना

1384

चिमूर: बरडघाट शेत शिवारात दबा धरुन असलेल्या वाघाने म्हशीवर वाघाने हल्ला करुन ठार केले. म्हशीचा शोध घेण्याकरीता जात असतांना त्या वाघाने ऋतिक गजानण तराडे (वय १९) या युवकावर हल्ला केला .या हल्ल्यात तो जखमी झाला. ही घटना रविवारी (ता.४) सकाळी १२ वाजताच्या सुमारास घडली.

तालुक्यातील खडसंगी येथील शेतकरी गजानन तराले व मुलगा ऋतिक तराले बरडघाट येथील जंगल क्षेत्रालगतच्या शेत शिवारात गाई,म्हशी चारायला गेले होते.जनावरे चरत असताना अचानक वाघाने म्हशीवर हल्ला करून ठार मारले.वाघाच्या हल्याने जनावरे बिथरली त्यामुळे म्हशीचा शोध घेत तिकडे बाप लेक गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने ऋतीक याचेवर हल्ला करून जखमी केले.यावेळेस ऋतिक व त्याचे वडील गजानण यांनी आरडाओरड केल्याने जवळपास असलेल्या शेतकऱ्यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली.ज्यामुळे वाघ जंगलाच्या दिशेने धावला.जखमीस उपजिल्हा रुग्नालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तीथुन रेफर करुन सामान्य रुग्णालय ,चंद्रपूर येथे उपचार घेत आहे.घटनेची माहीती चिमूर वनपरीक्षेत्र कार्यालय येथे देण्यात आली.घटनास्थळी वणपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी धाव घेतली.परीसरात वाघाचा शोध सुरू करण्यात आले आहे.नागरिकांनी गटागटाने मिळून जंगल परिसरातील शेतात कामे करावी असे आवाहान करण्यात येत आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये वन विभाग गावातील नागरीकांसोबत आहेत असा दिलासा देण्यात येत आहे.