कारच्या भीषण अपघातात सहा जणांचा दुदैवी मृत्यू…..

2094

चंद्रपूर : येथील नागपूरवरून नागभीडकडे भरधाव वेगात येणाऱ्या  ALTO MH -49 BR -2242 कारचा भीषण अपघात झाला.या अपघातात सहा जणांचा दुदैवी मृत्यू झाला. मृतकाची  नावे रोहन विजय राऊत (वय 30), ऋषिकेश विजय राऊत (वय 28), गीता विजय राऊत (वय 45), तिघेही रा. चंदननगर, मृतक सुनीता रुपेश फेंडर (वय 40), रा. इंदिरा नगर NIT गार्डन जवळ ,नागपूर, मृतक प्रभा रोखर सोनवणे (वय 36) रा.लाखनी जिल्हा भंडारा,  यामिनी रुपेश फेंडर (वय 9) असे आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. या कारमधील सहा पैकी चार जनांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन गंभीर  जखमी झाले होते.

त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.उपचारा दरम्यान त्या दोघांचाही  मृत्यू झाला.सदर घटनेची माहीती होताच घटनास्थळी नागभीड पोलीस अधिकारी पोहोचले आहे.अपघातातील कारमधून  कटरने कापून मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहे.  पूढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.