शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याने घरातील साहित्य जाळून खाक… जीवनावश्यक वस्तू,महत्त्वाच्या कागदपत्रांसह लाखो रुपयांचे झाले नुकसान…. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील घटना….- शरद कुकुडकर

1753

गोंडपिपरी: तालुक्यातील अडेगाव येथील अखिल वसंत नागापुरे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.आग इतकी भीषण होती की यात घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी (ता.5) सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली.घरातील सर्व कुठुंब जेवण करत असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. आग लागल्याने सर्व कुठुंबिय बाहेर निघून आरडाओरड केली.घराशेजारील लोक मदतीला धाव घेतली.4 ते 5 बोअरवेलच्या मदतीने आग विझविण्यात आली.परंतु आग इतकी भीषण होती की, घरातील आलमारीतील सात तोळे सोने आणि लाख रोख रक्कम, काही महत्वाची कागदपत्रे,कपडे, साड्या,सोपा कवाडी इत्यादी जाळून खाक झाले. सदर घटनेची माहिती सरपंच पोलीस पाटील,सदस्य तसेच गोंडपिपरी येथील पोलिस निरीक्षक यांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. या आगीत नागापूरे कुठुंबियाचे लाखोचे नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी कुठुंबीयांकडून मागणी केली जात आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहे.