भद्रावती: तालुक्यातील बेलगाव येथील एका १४ वर्षीय अल्पवयीने मुलीने प्रेमास नकार दिल्याने तीच्या घरी जाऊन एका मुलाने तीच्या अंगावर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.हा प्रकार कुठुंबीयाच्या लक्षात येताच मुलीला त्यांनी लगेच बाजुला केले.त्यामुळे मोठा अनर्थ टळला.या घटनेची माहीती पोलीसांना मिळताच त्यांनी मंगळवारी आरोपीला अटक केली. सिद्धांत भेले (वय18 रा. बेलगाव ) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल केले.त्याला न्यायालयात हजर केले असता १५ जून २०२३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी सिद्धांत भेले आणि पीडित मुलीची एकमेकांना ओळख होती. सोमवारी आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमासाठी प्रपोज केले. मुलीने त्याला ठाम शब्दांत नकार दिला. दरम्यान, काही वेळाने आरोपी सिद्धांत याने एका बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन थेट पीडित मुलीच्या घरी गेला आणि अंगावर टाकून जाळण्याच्या प्रयत्नात असताना कुटुंबीयांनी धावाधाव करून मुलीला बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला.
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी युवक व अल्पवयीन मुलीच्या कुटूंबियांकडून माहिती जाणून घेतली. पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे करीत आहे.