बल्लारपूर:- बुधवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास एका जुन्या वैमनस्यातून दिपक कैथवास वय – १९ वर्ष, रा. रवींद्र नगर वार्ड येथील तरुणाची हत्या झाली. दगड आणि धारदार शस्त्राच्या मदतीने आरोपींनी हे हत्याकांड घडविले. यामध्ये अर्जुन राजू कैथवास वय – २८, प्रथम शंकर पाटील वय – २५, गौरव राजू लिडबे वय – २२ वर्ष रा. मौलाना आझाद वार्ड आणि अमन दुखशौर कैथवास वय – २० वर्ष रा. बुद्ध नगर वार्ड येथील रहिवाशी आहे. चारही आरोपींनी सकाळी पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. हि हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील यांच्या निरीक्षणात सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.
मृतक दिपक आणि आरोपीमध्ये जुना वाद होता. घटनेपूर्वी सायंकाळच्या सुमारास मृतक दिपकचा यांचा मित्र भुऱ्या आणि आरोपी अर्जुन यांच्यात वाद आणि शाब्दिक बाचाबाची झाली. अश्यातच मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास दिपक के.जी.एन शाळेजवळ एकटा असल्याचे दिसून आले. याचा लाभ घेत दगड आणि धारदार शस्त्राच्या मदतीने दिपक रामआसारे कैथवास वय – २८ वर्ष, रा.रवींद्र नगर वार्ड याची जबर मारहाण करून हत्या केली. यामध्ये अर्जुन राजू कैथवास वय – २८ वर्ष, रा.मौलाना आझाद वार्ड, प्रथम शंकर पाटील वय – २५ वर्ष,रा.मौलाना आझाद वार्ड, गौरव राजू लिडबे वय – २२ वर्ष, रा. मौलाना आझाद वार्ड, रा. आणि अमन दुखशौर कैथवास वय – २० वर्ष रा. बुद्ध नगर वार्ड यांनी सकाळी पोलिस ठाणे गाठून हत्तेची कबुली दिली. चारही आरोपींना हत्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपींची अतिरिक्त चौकशीसाठी पोलीसांनी पाच दिवसाचा पिसीआर मा.न्यायालयाकडे मागितला आहे. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या निरीक्षणात सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये,याची खबरदारी पोलिस विभाग घेत आहे.