अपघातात मुलगी ठार वडील गंभीर….  विसापूर येथील घटना; चारचाकीची दुचाकीला धडक… 

1050

बल्लारपूर :- विसापूर जवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिली. हि घटना आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात वडील युवराज चींचोलकर वय – ४८ हे गंभीर असून मुलगी वेदांती युवराज चींचोलकर वय – १९ या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेचा तपास बल्लारपूर पोलिस करीत आहे.

लहान मुलाचे सैनिक शाळेत एडमिशन करण्यासाठी निघालेल्या वडील आणि मुलीला एका अज्ञात वाहनाने सायंकाळी ४ च्या सुमारास विसापूर जवळ धडक दिली. हि धडक ईतकी भीषण ठरली कि यामध्ये वडील
युवराज चींचोलकर वय – ४८ वर्ष रा. विसापूर, हे गंभीर जखमी झाले तर मुलगी वेदांती युवराज चींचोलकर वय – १९ वर्ष रा. विसापूर या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. युवराज चींचोलकर यांना गंभीर दुःखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत आहे. युवराज चींचोलकर हे पेपर मिल येथे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. तर मुलगी वेदांती हि महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. धडक देणाऱ्या वाहन आणि अपघाताचा तपास बल्लारपूर पोलिस करीत आहे.