स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत अडेगांव येथे कापूस पिकाचे खरीप हंगामपूर्व शेतक‌री प्रशिक्षणाचे आयोजन…

646

गोंडपिपरी- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत दि. 16/06/2023 ला तालुका कृषी अधिकारी, गोंडपिपरीच्या वतीने मौजा अडेगाव येथे कापूस पिकाचे खरीप हंगामापूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

सदर प्रशिक्षण मध्ये टोंगलवार कृषि पर्यवेक्षक यांनी स्मार्ट प्रकल्पाविषयी माहीती देऊन शेतकऱ्यांना एक गाव एक वाण मोहीमेसाठी अंतर्गत कापसाच्या एका वाणाची लागवड करुन कापसाच्या तयार करुन कापसाचे मुल्यवर्धन करण्याविषयी माहीती दिली. श्री पानसरे तालुका कृषी अधिकारी, गोंडपिपरी यांनी कापूस पिक लागवड लगसान विषयी माहीती दिली.

श्री पुरमझेदविर यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत केवायसी व आधार सिडींग चे प्रलंबित लाभार्थीच नावे वाचन करुन ई के वाय व आधार सिडगि करून घेण्याबाबत शेतकऱ्यांना आह्वान केले. तसेच मागील वर्षी शेतकरी पुरुष बचत गट अडेगाव यांनी गट प्रमुख श्री भगीरथ नागापुरे यांच्या पुढाकाराने 102 कापूस गाठी तयार केल्यामुळे श्री तालुका कृषी अधिकारी, श्री पानसरे साहेब यांच्या हस्ते श्री भगीरथ नागापूरे गट प्रमुख व त्यावेळेचे कृषी सहायक श्री पेन्दोर यांचा झाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला गावचे सरपंच सौ रेखाताई चौधरी अध्यक्षस्थानी होते. तसेच उपसरपंच श्री विजय चौधरी, ग्रा.प. सदस्य श्री शालिक झाडे, श्री संतोष कोवे, माजी सरपंच श्री पुरुषोत्तम रेचनकर, सेवा सह सोसा. अध्यक्ष श्री संजय धुडसे, मुख्याध्यापक श्री किशोर भोयर व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन श्री पुरम झेदवार कृषी सहायक यांनी केले तर आभार प्रदर्शन भी चेन्द्रे कृषी सहायक यांनी केले. यावेळी गावातील शेतकऱ्यांना स्मार्ट कॉटन अंतर्गत नियोजित प्रात्यक्षिकासाठी कापूस बियाणे वितरीत करण्यात आले.