जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंदवर्धन येथे शाळा प्रवेश उत्सव तथा नवागतांचे स्वागत उत्सव संपन्न… शरद कुकडकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

1707

गोंडपिपरी: सन 2023 -24 सत्राचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंदवर्धन येथे शाळा प्रवेशोत्सव, व कन्या प्रवेशोत्सव, तसेच पुस्तक दिन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाकर कुडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी सौ.सविताबाई शेडमाके श्री. दिवाकर बोरकुंटवार तसेच पहिल्या वर्गाचे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे माता व पिता यांचे प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापक श्री. चांदेकर सर. श्री.इंद्रपाल मडावी विषयशिक्षक, श्री. टेम्भुरने सर, श्री .रामटेक सर, विषय शिक्षक श्री. राजू राजकोंडावार सर, कु. पोटदुखे मॅम, आणि इयत्ता पहिलीच्या सर्व पालक उपस्थित होते.

सर्वप्रथम इयत्ता पहिलीतील प्रवेश विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. चांदेकर सर. श्री. इंद्रपाल मडावी सर, श्री. रामटेके सर,श्री. टेंभुर्डे सर यांनी सत्र 2023- 24 च्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन, सर्व मुलांनी नियमित शाळेत यावे. नियमित अभ्यास करावा .शाळेचे नियम आणि शिस्त पाळावे. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभाग घ्यावा. अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार माननीय श्री. राजू राजकोंडावार सर यांनी मानले. अशाप्रकारे शाळा व्यवस्थापन समिती, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने शाळा प्रवेशोत्सव तथा नवागतांचे स्वागत उत्सव आनंदमय वातावरणात पार पडले.