मुसळधार पाऊस ठरला पक्षप्रवेशाचा साक्षीदार… विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात अमन अंधेवार व त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश…

882

चंद्रपूर – महाराष्ट्रात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक वेगवेगळ्या हालचाली पहायला मिळत आहे. चंद्रपुरात सुद्धा मोठ्या हालचालींना वेग असतांना अमन अंधेवार या एका तडफदार तरुणाने त्याच्या शेकडो सहकाऱ्यांसोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात पक्ष प्रवेश केला.

चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील शहीद भगतसिंह चौकात हा पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा पक्ष प्रवेश युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरहे यांच्या मार्गदर्शनाखाली तर युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

हर्षल काकडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अमन अंधेवार यांच्या युवासेना, शिवसेना परिवारात येण्याने चंद्रपूर जिल्ह्यात बळकटी मिळेल आणि याचा परिणाम हा येणाऱ्या निवडणूकित होईल.

यावेळी मंचावर युवासेनेच्या नवनियुक्त महाराष्ट्र सहसचिव रोहिनीताई पाटील, शिवसेना शहरप्रमुख सुरेश पचारे, उपजिल्हा प्रमुख शालीक फाले, शिवसेना माजी शहरप्रमुख प्रमोद पाटील, संतोष नरुले, विनय धोबे, पवन नगराळे, उज्वला नलगे, वर्षा कोठेकर, कुसुम उद्गार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शब्दशाळा वक्तृत्व अकॅडमीचे संचालक प्रलय म्हशाखेत्री यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित अग्रवाल, रिजवान पठाण उपजिल्हा प्रमुख युवासेना, ऍड.अजित पांडे, शिवा वझरकर शहरप्रमुख, शहबाज शेख उपशहरप्रमुख , संघदीप रामटेके उपशहर प्रमुख युवासेना, नरेश वासनिक उपशहर प्रमुख युवा सेना व इतर युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत केली व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.