ब्रम्हपुरी,सिंदेवाही व सावली उपजिल्हा रुग्णालयासाठी १०० कोटींचा विकास निधी मंजूर आ. वडेट्टीवारांच्या प्रयत्नांचे फलित -: आयसीयू बेडसह रुग्णालय होणार अद्यावत

515

ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील ब्रम्हपुरी,सिंदेवाही व सावली तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रम्हपुरी क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनात ब्रम्हपुरी सिंदेवाही व सावली येथील उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू बेड सह इतर मूलभूत तसेच अद्यावत आरोग्य सेवा मिळावी या उदांत हेतूने सभागृहात मागणी रेटून धरल्याने अखेर आरोग्य प्रशासनाकडून वरील दोन्ही तालुक्याकरिता १०० कोटी २८ लक्षाचा विकास निधी मंजूर झाला असून माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे मानून राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक थारा देणारे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी जनसामान्यांच्या वेदना जाणत कर्करोगाचे महागडी उपचार व जीवित हानी ही गंभीर बाब लक्षात घेत मतदार संघासह जिल्ह्या करिता नुकतीच स्वखर्चातून मोफत कर्करोग निदान अद्यावत वाहनाचे लोकार्पण केले. राज्यातील या पहिल्या प्रयोगाचे संपूर्ण राज्यभरात कौतुक होत असून जिल्ह्यात यशस्वीरित्या कर्करोग निदानाची शिबिरे सुरू आहे. अशातच ब्रह्मपुरी मतदार संघातील जिल्हा रुग्ण सेवा लांब दूर असल्याने व अतिसंवेदनशील परिस्थितीत रुग्ण पोहोचू न शकल्याने अनेकांना प्राणास मुकावे लागते. आरोग्य सुविधा अभावी नागरिकांच्या जीव जाऊ नये याकरिता तसेच ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी व अति संवेदनशील स्थितीत नागरिकांना अद्यावत सेवा व महत्त्वपूर्ण असलेल्या अतिदक्षता विभागासह इतर मूलभूत व अद्यावत सेवा पुरविण्याकरिता सध्या राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ब्रम्हपुरी,सिंदेवाही व सावली येथील उपजिल्हा रुग्णालयाकरिता १०० कोटी २८ लक्ष रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात रेटून धरली. यावर अर्थसंकल्पीय बजेटमध्ये १००.२८ कोटींच्या विकास निधीला मंजुरी देण्यात आली असून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी सिंदेवाही व सावली येथील उपजिल्हा रुग्णालये कात टाकणार असून सदर तीनही तालुक्यातील नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेत वाढ होऊन याचा नागरिकांना लाभ होणार आहे . माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने ब्रम्हपुरी,सिंदेवाही व सावली या तालुक्यातील नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार मानण्यात येत आहे.