विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या…. गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरुर येथील घटना… -शाम म्हशाखेत्री,जिल्हा संपादक, चंद्रपूर

1036

गोंडपिपरी: तालुक्यातील चेकदरुर येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.26) दुपारच्या सुमारास घडली.भारत पैकन भोयर (वय 50) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत भारत पैकन या शेतकऱ्याने विष प्राशन केली. या घटनेची माहीत मिळताच गावात एकच खळबळ उडाली. मृत शेतकऱ्याला गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. भारत पैकन या शेतकऱ्यांच्या मृत्यूने सर्वत्र शोकाकुल वातावरण झाले आहे…