पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा (माल) येथील वीज पडून मृत्युमुखी झालेल्या परिवारास आर्थिक मदत.. प्रशांत झाडे तालुका प्रतिनिधी इंडिया दस्तक न्यूज

517

पोंभुर्णा :- काल दिनांक 26 /7/ 23 रोजी वादळ, मेघगर्जनेसह झालेल्या पावसात शेतात काम करीत असताना सायंकाळी 3.00 वाजताच्या सुमारास वेळवा येथील शेतमजूर अर्चना कुडमेथे यांचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना घडली. मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना जि. पं. माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर व तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष रवीभाऊ मरपल्लीवर यांनी त्त्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन आर्थिक मदत दिली, विनोद भाऊ अहिरकर यांचे कडून 6000/- रु. तर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रवीभाऊ मरपल्लीवर यांचेकडून 3000/-रु. आर्थिक मदत करण्यात आली, यावेळी NSUI चे अमित अहिरकर व गावकरी उपस्थित होते.