पोंभुर्णा येथे ओबीसी युवा मंचतर्फे मंडल यात्रेचे जंगी स्वागत प्रशांत झाडे तालुका प्रतिनिधी

431

पोंभुर्णा प्रतिनिधी:- ७ आॅगष्ट मंडल दिनाचे औचित्य साधून ओबीसी,व्हिजेएनटी,एसबिसी जनजागृती अभियानाअंतर्गत विदर्भातील ७ जिल्ह्यांत मंडल यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा आज पोंभुर्णा येथे दाखल झाली या यात्रेचे जंगी स्वागत ओबीसी युवा मंच तर्फे करण्यात आले.

जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना ७२ वसतिगृह व विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू झाली पाहिजे, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना १००% फी माफ झाले पाहिजे,महाज्योती संस्थेला १००० कोटी रुपयांचा निधी मिळाला पाहिजे, इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटी रुपयांचा निधी मिळाला पाहिजे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे सर्व जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय अधिकारी व ओबीसी भवन निर्माण झाले पाहिजे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाला ३०,००० कोटी रुपयांचा निधी मिळाला पाहिजे, तत्काळ शिक्षक भरती झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात याव्यात या विविध मागण्या घेऊन नागपूर येथुन ही मंडल यात्रा पुढे निघाली.
मंडल यात्रा पोंभुर्णा येथील सावित्रीबाई फुले चौकात दाखल होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. येणार्या पाहुण्यांचे स्वागत पोंभुर्णा नगरपंचायत चे नगरसेवक गणेश वासलवार, नगरसेवक अभिषेक बद्दलवार, समाजसेवक सद्गुरू ढोले, भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष अविनाश वाळके यांनी केले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यात्रा चे रुपांतर सभेत करण्यात आले यात उमेश कोहराम ,दिनानाथ वाघमारे, अॅड अंजली साळवे, प्रशांत ढोले, सुभाष उईके नवनाथ देरकर,अॅड माथनकर सर, गणेश वासलवार यांनी ओबीसी आरक्षणाबाबत व मंडल यात्रेचे महत्व याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रमुख ओबीसी नेते आनंदराव बावने सेवा निवृत्त मुख्याध्यापक, विजय कस्तुरे केवट समाज संघटना तथा माजी सभापती नप पोंभुर्णा, विनोद चांदेकर विधानसभा अध्यक्ष शिवसेना,पिंटु नैताम युवा नेते कांग्रेस, अशोक बोलीवार, संदिप गव्हारे युवा नेते तेली समाज संघटना, कालिदास मोहुर्ले माळी समाज संघटना, नरेंद्र धोडरे, मुकेश ढुमणे कुणबी समाज संघटना, इत्यादी ची उपस्थिती होती.सुत्रसंचलन अमोल भंडारवार तर आभार प्रदर्शन किशोर गुज्जनवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष कावळे माळी समाज संघटना,राजु नीलमवार बेलदार समाज कार्यकर्ते,बंडु मोहुर्ले,शुभम वासेकर,सुमित धोडरे,यादव धोडरे, प्रदिप ढोले,रुपेश मानकर, संदिप ढोले, अमोल मोहुर्ले,राकेश कंचर्लावार, भुषण इप्पलवार पुंडलिक बुरांडे,गुरुदास मुमुडवार, यांनी सहकार्य केले