पोंभूर्णा: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालय परिसरात शासनाचा वृक्षलागवड संकल्पनेचा भाग म्हणून वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. पोंभूर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत समितीचे सभापती रवींद्र मरपल्लीवार व उपसभापती आशिष कावटवार व सचिव,संचालक यांचे हस्ते १०० विविध प्रजातीची झाडांची लागवड करण्यात आली.
तसेच यापुढील काळात बाजार समितीच्या आवारा भोवती असलेल्या खुल्या जागेत वृक्षांचे वृक्षारोपन करण्याचा बाजार समितीने निर्धार केला आहे.
यावेळी संचालक वसंत पोटे,वासूदेव पाल,रवींद्र गेडाम,डॉ.नितेश पावडे,प्रवीण पिदूरकर,विनायक बुरांडे, सुनील कटकमवार,प्रफुल लांडे,अशोक साखलवार,नैलेश चिंचोलकर,धनराज सातपुते,सुनदा गोहणे,भारती बंदन,सचिव लिलाधर बुरांडे,शाम पदमगिरीवर आदी कर्मचारी उपस्थित होते.