वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी… पोंभुर्णा तालुक्यातील घटना…..

482

पोंभूर्णा :तालुक्यातील उमरी पोतदार येथील जंगलात जनावरांना गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला केला.ही घटना मंगळवारी (ता.८) रोजी घडली.या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाला. सुनिल कोडापे (वय२५) असे जखमी गुराख्याचे नाव आहे. सुनील आणि त्याचे इतर सहकारी गुराखी कक्ष क्र. ४४६ येथे गुरे चारण्यासाठी गेले. झुडुपात दबा धरून असलेल्या वाघाने चक्क सुनील या गुराख्यावर हल्ला केला. यादरम्यान इतर सहकाऱ्यांनी आरडा ओरड केल्याने वाघाने त्याला सोडुन दिले.परंतु या हल्ल्यात सुनील जखमी झाला. घटनेची माहिती वनविभागातील अधिकारी व गावकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन सुनीलला पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.