शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग : आरोपीला ठोकल्या बेड्या

884

प्रशांत झाडे (पोंभुर्णातालुका प्रतिनिधी)

पोंभुर्णा : वर्ग 2 री तील शालेय विद्यार्थिनी शिक्षकांच्या आदेशानुसार अंध अपंग मूकबधिर दिव्यांग यांच्यासाठी गावातून निधी गोळा करण्यासाठी सांगितले. सदर विद्यार्थिनीने निधी गोळा करीत असताना निधी देण्याचा बहाना करून करून आरोपीने विद्यार्थिनीला घरी बोलावून अतिप्रसंग केल्याची खळबड जनक घटना पोंभुर्णा तालुक्यातील बेंबाळ पोलीस दूरक्षेत्रांतर्गत जुनगाव येथे सोमवारला उघडकीस आली.

नितेश नवघडे वय 22 वर्ष रा. जुनगाव असे आरोपीचे नाव असून. विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून मुल पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यांच्याविरुद्ध पोस्को कायद्या अंतर्गत कलम 4. 8. बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा तसेच अनुसूचित जाती,जमाती अत्याचार संरक्षण अधिनियम कलम 3 (1) (11) (1) (2)3 (2) अन्वये गुन्हे दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.