गोंडपिपरी :- ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो.या दिवशी जगभरातील आदिवासी एकत्र येऊन आपापल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा ,गायन ,नृत्य करून हा दिवस अत्यंत आनंदाने साजरा करतात .संयुक्त राष्ट्र संघाने 1994 ला हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
आदिवासी समाजाच्या गरीबी,अज्ञान, आरोग्य, शिक्षण, मजुरी ,बेरोजगारी अशा समस्या सोडवणे हा या मागचा हेतू आहे. आदिवासी समाजाने खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करून निसर्गाचा समतोल राखला आहे.
आणि म्हणूनच 09 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो.हा दिवस आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.
पण आज घडीला देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना, आदिवासी समाज मात्र आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकाऱ, व विकसापासून वंचित आहे. आणि हा समाज अन्याय आणि अत्याचाराला बळी पडला आहे.
आज जगभरात 09 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा होत असताना, गोंडपिपरी येथे बिरसा मुंडा संघर्ष समिती यांच्या नेतृत्वात संपूर्ण तालुक्याच्या वतीने मणिपूर राज्यात घडलेल्या महिलांसोबत अमानुष अत्याचार, व हिंसाचार कलंकीत घडलेल्या घटनेचा शांतीमय, मूक आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आले.
सदर मोर्चाचे नियोजन/ आयोजन बिरसा मुंडा संघर्ष समिती पदाधिकारी श्री. सुरेशजी पेंढारकर (माजी प्राचार्य) श्री. हिराजी कन्नाके सर, श्री. इंद्रपाल मडावी सर, श्री. अनिल पेंढारकर सर, श्री. संतोष पेंदोर सर,सौ. सारिका मडावी (उपाध्यक्ष) नगरपंचायत गोंडपिंपरी, कु. मनीषा मडावी (नगरसेविका)श्री.रमेश पेंदोर सर, सौ. मनीषा पेंदोर मॅडम,श्री.संतोष मेश्राम ,श्री .शामराव मेश्राम, श्री.ज्ञानेश्वर कातलाम, श्री. गावडे सर, श्री.बबलू कुलमेथे आणि आदिवासी समाज यांच्या कृती समितीच्या वतीने भव्य शांतीमय मूक मोर्चाच्या माध्यमातून मणिपूर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.मूक मोर्च्यात तालुक्यातील शेकडोच्या संख्येने पुरुष, स्त्रिया ,आदिवासी समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
सदर मोर्च्याच्या यशस्वी ते साठी बिरसा मुंडा संघर्ष समिती आणि आदिवासी समाज बांधव गोंडपिपरी यांनी अथक परिश्रम घेतले.