१० ऑगष्ट १९८९ च्या भ्याड हल्यात शहीद शुर वीरांना श्रद्धांजली… मोफत नेत्र चिकित्सा तपासणीस उत्कृष्ट प्रतिसाद…

795
  1. बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) :आज दिनांक १०/०८/२०२३ रोज गुरवाला सकाळी ठीक ९ वाजता तालुक्यातील माराईपाटण येथील १० ऑगष्ट १९८९ रोजी झालेल्या नक्षलवादयांच्या भ्याड हल्ल्यात शाहिद पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्या समुर्थीप्रित्यर्थ पोलीस अधिक्षक,चंद्रपूर व पोलीस स्टेशन टेकामांडवाद्वारा आयोजित कार्यक्रमात शहीद जवानांणा आदरांजली वाहण्यात आली.

चंद्रपूर पोलीस आधिक्षक रवींद्र सिंह परदेशी, भा.पो.से), उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे( म.पो.से.), यांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद वीर जवानांना सलामी देऊन आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सपोनी सचिन जगताप,पोलीस उपनिरीक्षक रविंद्र म्हैसकर ,तसेच पोलीस स्टेशन टेकामांडवाचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा गोंगले, भारी पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक गोविंदवार,भारी पोलीस स्टेशन उपनिरीक्षक दुर्गे आदींची उपस्थिती होती.

यावेळी 365 दिवस चालणाऱ्या पालडोह शाळेतील विद्यार्थी तसेच टेकामांडवा,माराईपाटण या शाळेतील विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.यावेळी ग्राम. पं.माराईपाटणचे सरपंच यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून शहीद स्मारकचे,सौदर्यकरण करून देण्यात यावे.पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रवींद्र सिंह परदेशी यांनी माराईपाटण येथील शहीद शुर वीर यांच्या समुर्थीप्रित्यर्थ शाळेतील विद्यार्थी यांना संबोधित केले.तसेच शहीद स्मारक येथील सौदरिकरण पुढील याच कार्यक्रमाच्या दिवसा प्रयंत करून देऊ आणि पंधरा दिवसात वाचनालयाचे काम पाठपुरावा करून देऊ अशी सास्वती दर्शवली.डॉ.मनोज शेंडे नेत्र शल्य चिकित्सक, उपजिल्हा रुग्णालय,राजुरा,डॉ.व्ही.सी.मसराम नेत्र चिकित्सक अधिकारी ,उपजिल्हा रुग्णालय,वरोरा, डॉ.पवन गनुरे, नेत्र चिकित्सकअधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, गोंडपिंपरी, योगेंद्र इंदोरकर,नेत्रदान समुपदेशक,सामान्य रुग्णालय चंद्रपूर या वतीने नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.एस जी बुऱ्हाण १५ ते २० नागरिकांची डोळे तपासणी केली.यातील ०२ पुरुष व १महिला नेत्र चिकित्सा तपासणी दरम्यान ३ मोतीबिंदू चे पेशंट आढलून आले. करीता त्या नागरिकांना पुढील शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.

पंचायत माराईपाटणचे सरपंच सौ. शेशिकला सितू कोटनाके उपसरपंच विकास सोनकांबळे,ग्राम पं.सदस्य पांडू पंदरे,मिनी जंगु पंदरे,पोलिस पाटील राहुल एम.सोनकांबळे,सौ.संगीता कोटनाके म.पोलीस पाटील शेडवाही (भारी) पालढोह म.पोलीस पाटील, चंद्रकला वारलवाड, माराईपाटण तंटामुक्ती अध्यक्ष यादवराव कोटनाके,हिमायतनगर चे तंटामुक्ती अध्यक्ष मुनीर शेख,ताजूदिन शेख,शामराव गेडाम,चंद्रमणी मोरे,शेषराव कांबळे, शेडवाही(भारी) ग्राम.प.सदस्य संजय ग्राम. पं.टेकामांडवा चे उपसरपंच तुकाराम वारलवाड, माराईपाटण येथील विद्यार्थी विद्यार्थिनी व समस्त गावकरी मंडळी आदी उपस्थिती होती.

प्रास्ताविक विकास सोनकांबळे तर संचालन पालढव शाळेतील विद्यार्थिनी, दिविंका बाजगिर व संचीता चव्हाण यांनी मुख्यध्यापक राजेंद्र परतेकी यांच्या उपस्थित्त केले.तर पोलीस स्टेशन टेकामंडवाचे ठाणेदार रवींद्र म्हैसेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.