Homeचंद्रपूरएक पाऊल आत्मनिर्भरतेकडे : जैविक कोळसा जैविक इंधन जैविक खते प्रकल्प विकसित...

एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे : जैविक कोळसा जैविक इंधन जैविक खते प्रकल्प विकसित करण्यावर भर ग्रामगीता फार्मर प्रोड्युसर कंपनीचा स्तुत्य उपक्रम

चंद्रपूर, चिमूर- जैविक कोळसा,जैविक इंधन व सेंद्रिय खत आपल्याच देशात निर्मितीची संकल्पना यातून आत्मनिर्भर इंधन असे स्वप्न देशाचे माजी राष्ट्रपती व भारताचे महान वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची असून त्यांनी देशाला इंधन क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले होते हे स्वन्न आता वास्तवात आणण्यासाठी डॉ.शाम शिवाजी घोलप यांनी मीरा क्लीनफ्यूल्स लिमिटेड (MCL) कंपनीच्या माध्यमातून जैविक कोळसा जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती, पर्यावरण पूरक वस्तू असे प्रकल्प भारतभर सुरु करण्याचा संकल्प केला आहे. त्याचंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार प्रेरणेने स्थापन ग्रामगीता फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्येमानाने तालुक्यात जैविक कोल,बायो-सिएनजी व सेंद्रिय खतनिर्मिती,तसेच ग्रामीण भागातील महिलांमार्फत तयार होणाऱ्या पर्यावरण पूरक वस्तू असणार आहे.

त्याअंतर्गत येणाऱ्या मौजा नेरी ईथे पर्यावरण पूरक निसर्गाला जपणारा जैविक कोळसा प्रकल्प तयार होणार असून त्यासंबंधित कार्य चालू आहे यात सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामउद्योजक यांच्या सहकार्याने रोज शेतकरी मार्फत नेपियर गवत (हत्ती गवत) पुरविला जाणार आहे ज्यातून शेतकरी यांना शाश्वत उत्पन्न योग्य बाजारपेठ मिळणार आहे यातून तालुक्यातील शेतकरी खऱ्या अर्थानं सुखी समृध्द होईल असे शेतकरी यांना मार्गदर्शन करताना याचे प्रमुख श्री.अभिजित धनराज बेहते व्यवस्थापक श्री प्रफुल मदननकर,श्री अक्षय अवधूत,श्री शुभम निवल यांच्या निर्धारातून गावातील शेतकरी,महिला,तरुण वर्ग यांना सुखी,सुमृद्ध व आत्मनिर्भर बनवण्यासाठी संकल्प हाती घेतला असून अहोरात्र मेहनत घेत आहेत.

त्या साठी कचरा या रुपात हत्ती गवताची लागवड करून त्या गवतापासून जैविक कोळसा,इंधन-सेंद्रिय खते करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.त्यामुळे गावतील सभासद नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एकरी 1 लाख ते 2 लाख उत्पन्न अपेक्षित आहे याला कुठलीही नैसर्गिक आपत्ती नाही कमी खर्चा मध्ये येणारे हे पर्यायी पीक आहे याला 1 हजार प्रतिटन हमीभाव देण्यात आला असून याची खरेदी तयार प्रकल्प ठिकाणी केली जाईल व बिगर शेती असणारे महिला यांना व्यवसाय करण्यास मदत मार्गदर्शन करून त्यांना सक्षम करणे हे संकल्प ठेवण्यात आले आहे तसेच गावातील तरुण वर्ग यांना उपलब्ध रोजगार मिळणार असून संपूर्ण गाव समृद्ध होईल यावेळी सर्व सभासद, ग्रामस्थांनी यांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे तसेच सर्व ग्रामउद्योजक,शेतकरी वर्ग यांनी हा प्रकल्प गावाच्या व शेतकरी यांच्या हितासाठी असून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.आपली भू – माता,पर्यावरण यांना जपणारा हा जैविक कोळसा कोळशाला पर्याय असणार आहे ज्यामुळे प्रदुषण आळा बसणार आहे.

गावातील शेतकरी,तरुण वर्ग व महिला वर्ग यांना सक्षम बनविण्यासोबत त्यांना तांत्रिक बाबीचे ज्ञान देऊन आर्थिक उन्नती कशी साधता येईल याकडे आमचा प्रयत्न आहे व गावातील युवकांना रोजगार व महिला यांना उद्योग साठी प्रेरीत करून त्यांना मार्गदर्शन कंपणी कडून उपलब्ध करून देऊ अशे आश्वसन देण्यात आले याशिवाय देशात वाढती इंधन दरवाढ व घरघुती गॅस यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून येते काही महिन्यात याला दिलासा मिळणार आहे. – अभिजित ध.बेहते (कृषी अभियंता,सामाजिक कार्यकर्ता)

 सभासद शेतकऱ्यांना नेपीयर ग्रासची लागवड करण्याकरिता कंपनीच्या माध्यमातून बियाणेची मोफत व्यवस्था करून तांत्रिक माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे व हे गवत प्रतिटन 1 हजार खरेदी केल्या जानार आहे. यामुळे वार्षिक 1 ते 2 लाख रुपये अपेक्षित आहे ज्यामुळे शेतकरी यांना शाश्वत उत्पन्न मिळेल हे सर्व ग्रामउद्योजक यांच्या माध्यमातून सहकार्याने होणार आहे – प्रफुल मदनकर (बी एस सी कृषी)

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!