श्री शिवाजी महाविद्यालयात पोलीस विभागाद्वारे जागरुकता कार्यक्रम

188

राजुरा:श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक व पोलीस स्टेशन राजुराच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सायबर क्राईम, पोक्सो कायदा, विद्यार्थिनीच्या हिताचे कायदे, सोशल मीडियावरील फसवणूक अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सोबतच स्पर्धा परीक्षेबद्दल ही माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सतर्क राहून समाजातील वाईट प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी पोलिस विभागाला मदत करावी असे आवाहनही केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. वारकड उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सोबत कार्यक्रमाला संघपाल गेडाम व दिनेश देवाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की यांनी केले.