वरोरा:- तालुक्यातील माढेली ते धानोरा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, खड्ड्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे व तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सैनिक अभिजित कुडे व सामाजिक कार्यकर्ते चंपतराव साळवे यांच्या नेतृत्वाखाली झोपा काढा आंदोलन करण्यात आले तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा वरोरा येथे भीक मांगो आंदोलन करणार असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला. या रस्त्याने मोठे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे बससेवा बंद झाली विद्यार्थ्यांंना त्रास सहन करावा लागतो आहे. खासगी वाहनाने जीव मुठीत धरून विद्यार्थी प्रवास करत आहे गर्दी असल्याने मुलांना ऑटो ने लटकून प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्याने रेती उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने रात्री धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने अनेक अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी प्रवास करणे अवघड झाले आहे. लोकाना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. या मार्गाने सुरू असलेली वरोरा आजनसरा बस बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना प्रवासाचे साधन नाही. खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. तरी या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आली नाही या मुर्दाड प्रशासन व लोकप्रतिनिधी झोपेत आहे त्यांच्या निषेध व्यक्त करून झोपा काढा आंदोलन करण्यात आले. तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा वरोरा येथे भीक मांगो आंदोलन करणार. यांच्या कडे रस्त्यासाठी निधी नसल्यामुळे भीक मागून ते पैसे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवणार आहे. ग्रामीण भागातील रस्त्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. वरोरा तालुक्यातील संपूर्ण रस्त्याची हीच अवस्था आहे. लाजिरवाणी बाब असून तात्काळ काम करावे नाहीतर शिवसेना कार्यपद्धती ने आंदोलन करणार यावेळी अभिजित कुडे, चंपतराव साळवे (सामाजिक कार्यकर्ते) वामनराव चटप, रामदास तुरणकर, नामदेवराव पावडे, रामदासजी भोयर, समीर मडावी, वासुदेव गारघाटे, ऋषि चटप, अमोल गारघाटे,समीर आसूटकर ,आशिष परचाके, सुमीत गारघाटे,नितेश गारघाटे, शुभाष तळवेकर, अमोल तळवेकर, पुरुषोत्तम गारघाटे, रूपेश आत्राम, अजित गारघाटे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.