तळ्याच्या पारीवर अटकलाय आजादी का अमृत महोत्सव!!!! विरुर ग्रामपंचायत ने सन्मान केला की अपमान

694

खरंतर या देशाला स्वातंत्र्य मिळाल पाहिजे म्हणून कित्येक शूरवीरांनी क्रांतिकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये स्वतःचा प्राण अर्पण केला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं… म्हणून अशा शूरवीरांचा आपल्याला कधी विसर पडता कामा नये त्यांच्या बलिदानाचा कायमच सन्मान केला गेला पाहिजे हेचं आपल आद्य कर्तव्य आहे…आणि म्हणूनच” हर घर तिरंगा” हे आव्हान या देशाच्या पंतप्रधानानी केलं आहे… त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील 28,813 ग्रामपंचायतीने शहिदाच्या सन्मानार्थ एक फलक लावला पाहिजे असं सुद्धा आवाहन केलं गेला आहे… पण ग्रामपंचायत विरुर स्टेशन ने या फलकाचा अपमान केला आहे की काय ?अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे… मुख्य मुद्दा असा आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा शहीदाचा सन्माना प्रति अभिवादनाचा फलक तर ग्रामपंचायत विरूर् ने लावला पण मात्र ग्रामपंचायतच्या परिसरात किंवा गावातील मुख्य चौकात किंवा स्वच्छ आणि सुंदर ठिकाणी लावायचे सोडून तो फलक गावातील बाहेर सर्वाधिक घाणीचे साम्राज्य असणा-या तलावाच्या पारीवर लावण्यात आला आहे. जिथे मोठ्या प्रमाणात घाण आहे…या ठिकाणी प्रत्येक घरून केर कचरा व बरेच लोक मलमूत्र विसर्जित करण्यासाठी इथेच येत असतात आणि अशा ठिकाणी हा फलक लावणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा क्रांतीविराचां अपमान नाही का ? असा प्रश्न नागरिकांनी मनात उपस्थित झालं आहे… आणि जर का असं फलक लावायसाठी गावातला कुठलाच चौक स्वच्छ आणि सुंदर नसेल तर मग ग्रामपंचायत कुंभकर्णी झोपेत आहे की काय? असाही संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे… तेव्हा चुकीच्या ठिकाणी लागलेला हा फलक काढून गावातील मुख्य चौकात लावावा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना स्वच्छ ठिकाणी निदर्शणात येईल तरच स्वातंत्र्य क्रांतिकारीविरांप्रति असलेली सन्मानाची भावना कायम राहील.