ऊर्जानगर ग्रामपंचायत आहे की आरएसएसचे कार्यालय …. तथाकथित भारत मातेचा फोटो लावून ग्रामवासीयांना पाडलं विचार करण्यास भाग…

682

चंद्रपूर: पुढच्या वेळेस हे खपवून घेतल्या जाणार नाही भिम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी दिली तंबी…

स्वतंत्र भारताचा 77 वा मोहोत्सव सगडी कडे हर्ष उल्हासाने साजरा केल्या जात असताना ऊर्जानगर ग्रामपंचायत इथे आगडा वेगडा प्रकार निदर्शनास आला. तिथे चक्क भारत मातेचा तथाकथित फोटो भारतीय ध्वजच्या झेंड्या खाली लावण्यात आला. यावरून ग्रामवासियांमध्ये सर्वत्र चर्चेला उत आला कि ही ग्रामपंचायत आहे कि आर एस एस चे एखादी कार्यालय.
भिम आर्मी (भारत एकता मिशन )जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ तिथे पोहचले असता तिथे तो भारत मातेचा तथाकथित फोटो लावलेला होता. कार्यक्रमात बाधा येऊ नये या उद्देशाने सुरेंद्र रायपूरे शांत झाले पण शेवटी सरपंच व कार्यालयातील कर्मचारी तसेच वार्ड मेम्बर यांना तंबी देऊन आले कि पुढच्या वर्षी असला प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही. जर तसे परत केले तर येणाऱ्या अडचणीस सर्वस्वी जवाबदारी ग्रामपंचायत ऊर्जानगर यांची असेल.