स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी अवैध दारू विक्री जोरात… दोन आरोपींवर गुन्हा दाखल… गोजोलीतून दारू हद्दपार करा, महिलांची मागणी 

445

धाबा :- एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर थाटात साजरा होत असताना गोंडपिपरी तालुक्यातील धाबा उप- पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोजोली येथे मात्र सर्रास अवैध दारू विक्री सुरू होती. महिलांनी पुढाकार घेतला आणि चक्क दारू विक्रेत्यांच्या घरातूनच दारूचा साठा जप्त केला.

मागील अनेक वर्षापासून गोजोली येथे अवैध दारू विक्रीचा धंदा तेजित सुरू होता. याचा नाहक त्रास येथील महिलांना सोसावा लागत होता. गावातील तरुण मुले या व्यसनाच्या आहारी गेली होती. यामुळे त्रस्त गावातील महिला एकत्र येत या अवैद्य धंद्यावर आळा घालण्यासाठी पुढे सरसावल्या आणि दि .15 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता च्या सुमारास अवैध दारु विक्री करणाऱ्या रघुनाथ हनुजी कोटनाके यांच्या घरातून अवैधरीत्या विक्री साठी ठेवलेले दारू जवळपास 100 नग प्रत्येकी (90ml) पकडली. आणि थेट उप पोलीस स्टेशन धाबा येथे फोन केला.

लागलीच येथील ठाणेदारासह पोलीस शिपाई हजर झाले. अवैध दारू विक्रेते संतोष हनुमान तुमराम वय 31वर्ष रा.चंद्रपूर, व रघुनाथ हनुजी कोटनाके वय 45वर्ष रा.गोजोली या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसानं समोर सर्व महिलांनी या अवैध दारू विक्री मुळे होणारी कुटुंबाची वाताहत कथन करीत गोजोली गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद करण्याची मागणी केली आहे.