पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तारण लिलावात शेतकऱ्यांच्या धानाला मिळाला योग्य भाव…!!

314

पोंभूर्णा: आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट याड मध्ये शेतमाल तारण योजनेचा लिलाव घेण्यात आला. यामध्ये तालुक्यातील ७८. शेतकऱ्यांनी आपला धान कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तारण योजनेत ठेऊन लिलावात सहभाग घेतला होता. आजच्या बाजार भावापेक्षा. व्यापारी यांनी जादा दराने बोली बोलून शेतकऱ्यांना योग्य भाव दिला. यामध्ये शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रजी मरपल्लीवार,उपसभापती आशिषजी कावटवार, संचालक वसंतजी पोटे,रवींद्रजी गेडाम, राकेशजी गव्हारे, डॉ.नितेशजी पावडे, सुनीलजी कटकमवार, व प्रभारी सचिव लिलाधर बुरांडे,व आदी कर्मचारी योग्य सहकार्य करीत उपस्थित होते.