सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
गोंडपिपरी : गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवरील सकमुर (चेकबापुर) गट ग्रामपंचायतची ग्रामसभा आज ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून गावातील शाहीराज आलोने यांची निवड करण्यात आली.
दरवर्षी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीवर एक तृतीयांश कमिटी नव्याने निवडली जाते. दरम्यान आज झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शाहीराज अलोने यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवडणूक ग्रामपंचायत सदस्य संतोष मुलगवार यांच्या नेतृत्वाखाली लढली होती.
शाहीराज अलोने हे गावातील अनुभव राजकारणी व्यक्ती आहेत. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. सोबतच शाहीराज अलोने हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याने गावातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संतोष मुलगवार, सदस्य कोमल संतोष मुलगवार, नितेश कोटावार, समीर कंटीवार, रमेश कुच्चलवार, भारत अलोने, मारुती गोविंद अलोने, मल्लय्या मुगलवार, गंगाराम सोनटक्के, मिथुन दुर्गे, सुभाष दुमनवार, ओमप्रकाश कुचलवार, भारत टेकाम, संजय तेलजीलवार, मधुकर अलोने, कचरू अलोने, कालिदास शेरके, मनोज झाडे, शांताराम घुबडे, संतोष वाघाडे, श्रीहरी अलोणे यासह गावातील नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.