जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील कृषी केंद्राची कृषी अधिकारी, पंचायत समिती यांनी नुकतीच तपासणी केली असता भारी येथील एका कृषी केंद्राची रासायनिक खते व कीटकनाशके यांचा विक्री बंद आदेश काढण्यात आला आहे. ही मागील दोन महिन्यातली दुसरी कार्यवाही असून मागील महिन्यात जिवती येथील एका कृषी केंद्राचा रासायनिक खताचा परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
भारी येथील सचिन कृषी केंद्राच्या तपासणी दरम्यान साठा पुस्तक न ठेवणे, विक्रीचा अहवाल दरमहा कृषी विभागास सादर न करणे, खरेदी / विक्रीची बिले न ठेवणे इत्यादी अनियमितता आढळून आल्याने दिनांक ६ सप्टेंबर २०२३ ला
रासायनिक खते – १,७२,१३० रुपये व किटकनाशके – १,६६,२३५ रुपयाचे विक्री बंदचा आदेश कृषी अधिकारी, पंचायत समिती जिवती यांनी काढला आहे.
तसेच जिवती येथील महेक कृषी केंद्राच्या तपासणी दरम्यान एकाच शेतकऱ्याला ई पास मशीनद्वारे मर्यादेपेक्षा जास्त युरिया खताची विक्री केल्याचे आढळून आल्याने महेक कृषी केंद्र जिवतीचा रासायनिक खताचा परवाना निलंबनाचा प्रस्ताव दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी कृषी विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे सादर करण्यात आल्याची कार्यवाही कृषी अधिकारी, पंचायत समिती जिवती यांच्याकडून करण्यात आली आहे.