पोलिस पाटील भरती प्रक्रिया रद्द करून पुनः घ्यावी.. अन्यायग्रस्त उमेदवाराची पत्रकारपरिषदेत मागणी..

314

चामोर्शी:- येथील उपविभागा अंतर्गत ( महसूल) तालुक्यातील काही गावात रिक्त असलेल्या पोलिस पाटील करिता भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती , त्यानुसार पोलिस पाटील पदाच्या नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या परिक्षामध्ये परीक्षा केंद्रावर प्रश्न पत्रिका पकिटाचे सिल उघडले असल्याचे निदर्शनास आल्याने त्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून अगोदरच प्रश्न पत्रिका लीक झाली असावी असा संशय व्यक्त केला जात असून त्यासाठी सदर परीक्षा रद्द करून नव्याने पुनः पारदर्शक पणे घेण्याची मागणी जनार्दन चलाख रामपूर , पूनाजी पीपरे , राजेश मंडल सिमुलतळा, अभिजित हाजरा, प्रभात बिस्वास, जयंत प्रमाणित, शरद कुनघाडकर, गणेश पिपरे, दिपंकर दास, नितीश मंडल जयनगार , गणेश बाढई विजयनगर, देवाशिस मंडल आदी या उमेदवारांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, तालुक्यातील काही गावात रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आली त्यानुसार मोठ्या प्रमाणात गावा गावातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यानुसार ०२ सप्टेंबर रोजी येथील शिवाजी हायस्कूल व बोमनवार हायस्कूलच्या केंद्रावर उमेदवार लेखी परीक्षे करिता दाखल झाले होते. परीक्षा सुरू होण्याअगोदर शिवाजी हायस्कूलच्या खोली क्र.०५ मध्ये दोन उमेदवारांना प्रश्न पत्रिका पाकीट खोलण्याकरिता बोलावण्यात आले तेव्हा पाकीटचे सिल उघडले असल्याचे निदर्शनास आले असता त्याचवेळी पर्यवेक्षकाच्या लक्षात आणून दिले मात्र त्यांनी दखल न प घेता उलट दबाव निर्माण करून परीक्षा देण्यास भाग पाडले. असल्याचे पत्रकार परिषदेत सांगत ,पुढे सांगितले की ऐका गावातील ऐका उमेदवाराला परीक्षा सुरू होण्याअगोदर परीक्षेत येणाऱ्या प्रश्नानाची सर्व माहिती देण्यात आली होती. कारण तो उमेदवार परीक्षा सुरू होण्या अगोदर हे प्रश्न येणार म्हणून सांगत होता, आणि तेच प्रश्न परीक्षेत आलेले होते तर पर्यवेक्षक इअर लाऊन फोनवर बोलत नेहमी परीक्षा खोली मध्ये येरझाऱ्या घालत होते त्यामुळे पेपर फुटल्याचा संशय व्यक्त होत असून ०४ सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयात मेरिट लिस्ट लावण्यात आली परंतु लिस्ट मध्ये उमेदवाराचे मार्क दाखविण्यात आले नाही. त्यामुळे संशय अधिकच वाढला दरम्यान ०३ सप्टेंबर रोजी सिमुलतला येथील उमेदवारांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार दाखल केली त्यामुळे त्यांची मौखिक परीक्षा रद्द केली मात्र प्रश्न पत्रिका ऐकच असताना सुध्दा उर्वरित उमेदवाराची मौखिक परीक्षा घेण्यात आली. हे विसंगती निर्माण करणारा निर्णय घेण्यात आला असून शिवाजी शाळेतील खोली क्रं.०४ मधील ऐक उमेदवार आपल्या हातावर सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून आणल्याचे प्रत्यक्ष पाहल्याचे ऐका उमेदवाराने सांगितले आहे .तर त्याच खोलीतील ऐका परीक्षार्थी उमेदवाराने मला काही प्रश्न सांगितले तेच प्रश्न परीक्षेत आलेले आहे असल्याचेही दुसऱ्या उमेदवाराने सांगितले.त्यामुळे हे प्रश्न पत्रिका लीक झाली असावी ते प्रश्न दोन्ही केंद्रावर परीक्षे पूर्वी गेले त्यामुळे सदर परीक्षा रद्द करून सीसीटीव्ही खोलीत बसवून नव्याने परीक्षा घ्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री व खासदार अशोक नेते, आमदार डॉ देवराव होळी यांना दिलेल्या निवेदनातून केली असून न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा अण्यायग्रस्त उमेदवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या प्रकरणी येथील उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसांम याना विचारले असता त्यांनी, आपल्या कार्यालयातून प्रश्न पत्रिकेचे बंद लिफाफे केंद्रावर पाठवले होते. तसेच केंद्र प्रमुख गजानन भांडेकर यांना सुध्या सिल बंद लिफाफे देण्यात आले होतेतसेच त्यांनी त्याची रीतसर पावती दिली होती त्यामुळे या परीक्षेत कोणताच प्रकारचा घोळ झालेला नाही परीक्षा प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यात आली असल्याचे सांगितले.