आदिवासी आरक्षण हे खिरापत नाही., उगाचच डिवचू नका ! जिवती येथिल मोर्चात आदिवासीचा शासनाला इशारा

588

जिवती (ता.प्र.) : आदिवासी आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे जी पार्टीची, मंडळाची पदे वा निवडणुकीतील तिकीटे वाटप करतात तशी करायला.आदिवासी समाज शांत आहे म्हणून डिवचण्याचा प्रयत्न करू नका.जंगलातील या वाघाला उगाचच डिवचल्यास तुम्हाला सळो की पळो केल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा जिवती येथिल मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना बापुराव मडावी, भीमराव पाटील मडावी, युवा नेते गजानन पा.जुमनाके यांनी राज्यकर्त्यांना दिला.

धनगर या एका जातीसाठी असलेले भटक्या जमातीचे ३.५ %आरक्षण खुशाल वाढवून मागावे, आमचा नकार नाही.मात्र ते आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नसतांना आमचा वाटा मागण्याच्या भानगडीत पडू नये. राज्यकर्त्यांनी धनगरांना आकाशातील चांदणे दाखविण्यापेक्षा शासनाने नेमलेल्या संशोधन समितीचा २००६ चा आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) मुंबई २०१८ चा अहवाल दाखवावा व सत्य सांगावे. असेही मार्गदर्शनात सांगितले.
आदिवासी आरक्षणात धनगर वा इतर जातीचा समावेश करू नये, पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे, कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय रद्द करणे, तालुका राखिव वनक्षेत्रातून वगळणे, जिल्हा परिषद व शासकीय आश्रम शाळांचे खाजगीकरण थांबवावे यासह विविध मागण्यासाठी मुळनिवासी एकता संघर्ष समिती जिवतीच्या वतीने काढण्यात आलेला आदिवासीचा जंगोम जन आक्रोश मोर्चा लक्ष वेधण्यासाठी स्थानिक क्रांतिविर बाबुराव शेडमाके चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे चारही बाजूंनी जाणारी वाहतूक जवळपास २ तास ठप्प पडली होती. तहसिलदार यांनी मोर्चाच्या ठिकाणी निवेदन स्वीकारले.
मोर्चाचे नेतृत्व आदिवासी समाजाचे जेष्ठ नेते भिमराव पा.मडावी, युवा नेते, गजानन जुमनाके, माजी सभापती,भिमराव मेश्राम,नामदेव जुमनाके, सुनिल मडावी,शामराव गेडाम,क्रिष्णा सिडाम, मलकु कोटनाके,बापूराव मडावी,सत्तारशाह कोटनाके,भोजी आत्राम,बाजीराव वल्का, महीपाल मडावी,धर्मा पेन्दोर,भिमराव जुमनाके,अमृत आत्राम,मारु पा.नैताम,सुकलाल कोटनाके,शंकर गेडाम, सतलुबाई गोदरु जुमनाके,अनिताताई धृर्वे, शुभांगी जुमनाके, आश्विनीताई कोरांगे, मु.नि.ए.सं. समितीचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मण मंगाम,कोषाध्यक्ष, कंठु कोटनाके, सचिव,सिताराम मडावी, केशव कुमरे, निलेश मेश्राम,विलास आत्राम व समस्त आदिवासी समाज बांधव यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन कंठु कोटनाके व लिंगोराव सोयाम यानी केले तर प्रास्ताविक सिताराम मडावी यांनी केले तर आभार प्रा.लक्ष्मण मंगाम यांनी केले